कर्नाटकमधील हंपी शहरातील ५० देवळांचे दर्ग्यांत रूपांतर !
10-07-2008
हिंदूंनो, सावधान !
हंपी (कर्नाटक), ५ जुलै (वार्ता.) - देवळांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंपी या शहरातील अंदाजे ५० जुनी देवळे व मंडप यांचे आता दर्ग्यांत रूपांतर झाले असून संपूर्ण हंपीचे इस्लामीकरण होत आहे. हे हिंदूंकडून वेळीच थांबवले न गेल्यास हंपीच्या प्रसिद्ध विरुपाक्ष देवळाचे इस्लामीकरण होऊन त्याचेही दत्तपिठासारखे दर्ग्यात रूपांतर झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे प्रतिपादन प्रख्यात संशोधक डॉ. एम्. चिदानंद मूर्ती यांनी केले आहे.
हंपीच्या हनुमपाद डोंगरामधील काही मंडपांचे दर्गे करण्याचा प्रयत्न चालला आहे. देऊळ अणि मंडप यांच्याच दगडांचा वापर करून हे दर्गे बांधले जात आहेत. पुरंदर मंडपाच्या बाजूला हिंदूंच्या `ईरण्ण गुडी' म्हणून ओळखल्या जाणार्या स्मारकाचे रूपांतर `होन्नरूस्वामी दर्ग्यात' झाले आहे. आता तेथे दरवर्षी उरूस होतो. पुरंदर मंडपाचा वापर कोंबड्या शिजवण्यासाठी केला जातो. तीन वर्षांपूर्वी हजारराम देवळासमोर मुसलमानांनी नमाज पढला होता. या प्रकरणी अटक झालेला आरोपी इम्रान हा दहशतवादी होता. २५ जानेवारी रोजी एका मुसलमानाला हंपी येथील प्रसिद्ध महानवमी टेकडीवर नमाज पढण्यास स्थानिक `गाईड'ने विरोध केला. त्यावर त्या मुसलमानाने त्या `गाईड'ला अर्वाच्य शब्दांत ओरडून तेथून बाहेर घालवले. `गाईड'ने पोलिसांना कळवल्यानंतर त्या मुसलमानाने क्षमापत्र लिहून दिले, असे श्री. चिदानंद मूर्ती यांनी सांगितले. हनुमपाद पर्वताकडील हाळू शिवमंदिरामध्ये नागप्रतिमा आहे. त्या मंदिराला `संतान नागदेवतालय' असे म्हटले जाई. अपत्यप्राप्तीसाठी भाविक तेथे नवस करत असत; पण आता त्याचे सय्यद बाग्दाद शहा दर्ग्यात रूपांतर झाले असून तेथे उरूस करण्यास प्रारंभ झाला आहे. इ.स. १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्य मुसलमानांनी उद्ध्वस्त केले व हंपी या देवळांच्या शहराला उतरती कळा लागली. आता हेच हंपी गाव मुसलमान पुन्हा बळकावू पहात आहेत, असे श्री. चिदानंद मूर्ती म्हणाले. स्वतंत्र भारतातील सर्व हिंदू गप्प राहिले आहेत व बघ्याची भूमिका घेत आहेत. भविष्यात हंपीमध्ये हिंदु धर्माचा लवलेशही उरणार नाही व हंपी मुसलमानांच्या ताब्यात गेल्याची नोंद इतिहासकार उत्साहाने करतील साहित्यिक या विषयावर कथा-कादंबर्या लिहितील, अशा शब्दांत श्री. मूर्ती यांनी खेद व्यक्त केला. जबाबदार सरकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व शासन यांनी हंपीच्या संरक्षणासाठी कृती केली पाहिजे. या सर्व इस्लामीकरण होत असल्याच्या बाबी कन्नड व संस्कृती खात्याच्या निदर्शनास आणून दिल्या. तरीही ते या प्रकरणी दुर्लक्ष करत आहे, असे ते पुढे म्हणाले.